धर्मसंस्थापनेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी युगानुयुगे भगवंताचे निरनिराळे अवतार या भारतवर्षाच्या पुण्यभूमीत होऊन याच श्रेणीतील साक्षात भगवान शिवांचा "चिदंबर " या मूळ नावाने अवतार सुमारे २५० वर्षांपूर्वी कर्नाटक प्रांतात झाला. या अवताराची व चिदंबर नामाची महती महर्षी वेदव्यासांनी "स्कंदपुराण" या ग्रंथात अगोदरच वर्णिली आहे.
GET HELP NOWअशा या दिव्य "शिवचिदंबर" नामाची महती महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात
पोहोचविण्याचे अद्भुत कार्य
"चिदंबरस्वरूप प. पू. सद्गुरु उमाकांतभाऊ
कुलकर्णी (श्रीरामपूर)"
यांनी केले. चिदंबर महास्वामींच्या दिव्य
साक्षात्कारानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन चिदंबर भक्ती प्रसारासाठी
समर्पित केले.
या अवताराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या अवताराप्रसंगी भगवंताने दिलेले "नामस्मरणमात्रे जनांसी । उद्धरी मी निश्चयेसी॥" हे वचन अर्थात भगवान चिदंबर ग्वाही देतात की, माझ्या "शिवचिदंबर" नामाच्या व उच्चार करणाऱ्या मनुष्याच्या कपाळावरची ब्रम्हलिपी मी पुसून टाकेन आणि त्याचा उध्दार करेन.
GET HELP NOWयदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
धर्मसंस्थापनेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी युगानुयुगे भगवंताचे निरनिराळे अवतार या भारतवर्षाच्या पुण्यभूमीत होऊन याच श्रेणीतील साक्षात भगवान शिवांचा "चिदंबर " या मूळ नावाने अवतार सुमारे २५० वर्षांपूर्वी कर्नाटक प्रांतात झाला. या अवताराची व चिदंबर नामाची महती महर्षी वेदव्यासांनी "स्कंदपुराण" या ग्रंथात अगोदरच वर्णिली आहे.
या अवताराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या अवताराप्रसंगी भगवंताने दिलेले "नामस्मरणमात्रे जनांसी । उद्धरी मी निश्चयेसी॥" हे वचन अर्थात भगवान चिदंबर ग्वाही देतात की, माझ्या "शिवचिदंबर" नामाच्या व उच्चार करणाऱ्या मनुष्याच्या कपाळावरची ब्रम्हलिपी मी पुसून टाकेन आणि त्याचा उध्दार करेन.
अशा या दिव्य "शिवचिदंबर" नामाची महती महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोहोचविण्याचे अद्भुत कार्य "चिदंबरस्वरूप प. पू. सद्गुरु उमाकांतभाऊ कुलकर्णी (श्रीरामपूर)" यांनी केले. चिदंबर महास्वामींच्या दिव्य साक्षात्कारानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन चिदंबर भक्ती प्रसारासाठी समर्पित केले.
त्यासाठी त्यांनी चिदंबर सेवा समिती (महाराष्ट्र) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तसेच कर्नाटकातील कुंदगोळ येथे चिदंबर महास्वामींची मंदिरे उभारली. या मंदिरांच्या माध्यमातून सद्गुरु प.पू. उमाकांतभाऊंनी जीवनाच्या भोगलोलुपतेत अडकलेल्या आजच्या समाजाला विशेषत: आजच्या तरुण पिढीला भक्तीमार्गाला लावण्याचे अव्दितीय कार्य केले. ईश्वराच्या उपासनेनेच जीवनात खरे समाधान प्राप्त होऊ शकते हे त्यांनी तरुणांना युक्तीने समजावून सांगितले.
आज चिदंबर सेवा समितीच्या (महाराष्ट्र) प्रत्येक कार्यात दिसणारी तरुणांची लक्षणीय उपस्थिती ही प.पू. सद्गुरु उमाकांतभाऊंच्या कार्याची पावतीच आहे.
प. पू. सद्गुरु उमाकांतभाऊंनी स्थापन केलेल्या मंदिरांमध्ये प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील गिरगुणे वस्ती (ता. राहुरी), मानोरी (ता.राहुरी), तांदुळवाडी (ता. राहुरी), उंडे वस्ती (ता. राहुरी), ताहराबाद (ता. राहुरी), हम संजयनगर (ता. श्रीरामपूर), राजुरी (ता. श्रीरामपुर), आश्वी (ता. संगमनेर) , निमगाव जाळी (ता.संगमनेर), खोसपुरी (ता. नगर), खामगाव (ता. नेवासा)
तसेच पुणे जिल्ह्यातील मोकसबाग (ता. जुन्नर), ओझर (ता. जुन्नर), पिंपरी-चिंचवड शहर, लाखणगाव (ता. आंबेगाव) आणि सांगली जिल्हयातील मनेराजुरी (ता. तासगाव) या मंदिरांचा समावेश होतो.